शब्द
शब्द

1 min

37
शब्दा सोबत शब्द बोलले जाते
शब्दा सोबत शब्द वाचले जाते
शब्दाविन मौन पाळले जाते
शब्दाविन चित्र रचले जाते
शब्द अर्थहिन खोडले जाते
शब्द व्यर्थहिन मोडले जाते
शब्दाने भावुक केले जाते
शब्दाने कठोर केले जाते
शब्दाने शब्द वाढवले जाते
शब्दानेच शब्द जपले जाते
शब्दाने माणुसकी कमवली जाते
शब्दाने आपुलकी मिळवली जाते
शब्द शब्दाने शिकले जाते
शब्दाने व्यवहार कळले जाते
शब्दाने शब्दाला नाचवले जाते
शब्दाने तत्वज्ञान मांडले जाते
शब्दानेच आयुष्य सुंदर केलं जाते..!