STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

4  

AnjalI Butley

Abstract

बाजार...

बाजार...

1 min
185

दिवाळी, देवदिवाळी संपली

वेध लागले लग्न सोहळ्याचे


वधुवर शोधण्या

नाव नोंदणी होते

वधुवर मेळाव्यात


एका गावातुन दुसर्या गावाचे

मेळावे घातले जातात पालथे


शिकलेले, कमी शिकलेले

श्रिमंत, गरीब चढाओढ असते सुरू


मुल मुली शोधतांना

विद्रुप रूप येत समोर


विंडो शॉपिंगची मानसिकता घेऊन 

वधुवर पालक दिसतात ह्या बाजारात खूप


मुलींच्या अटी असतात खूप

लग्न झाल्यावर नसत राहायच सासूसासर्यांबरोबर


मुल म्हणतात आधुनिक बायको हवी

माझ्या आईवडिलांच मन लावुन सेवा करणारी हवी


माहिती पुस्तिका, अॉनलाईन

माहिती मिळते घरबसल्या


फुकट मिळालेल्या माहितीचा

समाज, समाजबाहेरील लोक घेतात गैरफायदा


जमत आलेल लग्न मोडले जातात क्षणार्धात


माहिती पुस्तिका जाते रद्दीत


समाज समाज करतांना

घातल्या जातात आधुनिक न पटणार्या काही अटी


हुंडा नको म्हणारे मागतात

आधुनिक आलिशान महागड्या वस्तु


खोट्या श्रीमंतीचे प्रदर्शन ह्या बाजारात दिसत खूप


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract