बाबांची महती
बाबांची महती
काय लिहू कसे लिहू
शब्द साथ देत नाही
कसा शब्दात मांडू
तुजविन बाबा कोणी नाही
खस्ता खाल्ल्या खूप
अन् राबले दिवस-रात्र
मुलांचे भविष्य घडविता
झिजविले स्वत:ला अहोरात्र
काबाडकष्ट करूनी
संसार थाटला सुखाचा
कधी कमी पडू दिले नाही
हाच एक ठेवा माझ्या बाबांचा
प्रामाणिकपणाचा आदर्श
ठेवला आपल्या मुलांसमोर
संकटाशी दोन हात करण्याची
कला आणली माझ्यासमोर
बघता लहानाचे मोठे झालो
तुमच्या सानिध्यात राहून
काही क्षणांची विश्रांती घ्या
पावले चालती मान ठेवून
