STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

4  

Supriya Devkar

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
704

बाबा एक विश्वास आहे 

एक नवा ध्यास आहे आहे

कुटुंबाचा कणा आणि 

सर्वांसाठी तो खास आहे॥१॥


बाहेरून कितीही टणक 

आतून लोण्याचा गोळा आहे

कितीही दुःख सामोरी येत

बाबा आनंदाचा सोहळा आहे॥२॥


संघर्षाच्या युद्धामध्ये 

हिमतीचा पहाड आहे 

जीवन घडविणारा बाबा 

एक संस्काराच बाड आहे॥३॥


लहानपणी आनंदी ठेवणारी

 चालती बोलती बाहुली आहे 

उन्हात चटके सोसू न देणारी 

बाबा आयुष्याची सावली आहे॥४॥


जबाबदाऱ्यांचे ओझे वाहणारा 

संसाररूपी रथाचा सारथी आहे

साऱ्यांना सोबत घेऊन चालणारा 

बाबा कुटुंबाचा महारथी आहे॥५॥

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational