STORYMIRROR

saili nevrekar

Inspirational Others

4  

saili nevrekar

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
186

कोवळ्या वयातला आईकडे झुकणारा कल माझा , 

आता न कळतपणे बाबांच्या दिशेला वळू लागतोय 

जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकत चाल्लेला जीव माझा 

त्यांच्या संघर्षाची कहाणी व्यक्त करू पाहतोय !


भिती नेहमीच असायची बाबांच्या स्वभावाची,

कधी राग-रुसवा अनावर , तर कधी धपाटे खाण्याची 

चूक घडली की पुरतीच कोंडी व्हायची माझी

त्यात भर " बाबांना नाव सांगू " ह्या आईच्या घोषवाक्याची !


गाण्यांसारखा बाहूली चा खेळ तर आठवत नाही‌ 

पण शाळेचा गणवेश मात्र नेहमीच नवा मिळायचा ,

सहलीच्या होकारासाठी चाल्लेला अट्टाहास माझा

कुणास ठाऊक न सांगताच त्यांना कसा काय कळायचा !


सुटायला लागली आहेत अडलेली गणितं सारी 

पावलावर पाऊल आता बाबांच्या ठेवताना ,

त्यांच्या प्रत्येक शिक्षेमागची कारणं उमगतायत 

स्वतःच्या मेहनतीचे दोन घास जेवताना !


विषय तसा अवघडच आहे म्हणा 

ताबा सुटतो शब्दांवरचा वाक्यात ओवताना

कितीदा जपावा मी हा बांध भावनांचा

उरी हुंदका दाटून येतो गोष्ट बापाची सांगताना  !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational