गुढी उभारू मांगल्याची
गुढी उभारू मांगल्याची
1 min
274
इतिहास झाला साक्षी
पाडव्याच्या सणासाठी
उधळूनी पुष्पमाला
रोवू विश्र्वासाची काठी !
शब्द माला शर्कराची
गुंतवावी भोवताली
वरी शेला अस्मितेचा
जोड रांगोळीला घाली !
आले श्रीराम नगरी
विश्व आदरें ब्रम्हांना
नित्य स्मरावे ह्या दिनी
शूर त्या शालीवाहना !
चैत्र पालवी आरंभी
करु स्वागत ग्रीष्माचे
थुंकू कडुलिंबासवे
राग रुसवे मनाचे !
नव्या वर्षाचा प्रारंभ
ठेवू जाण संस्कृतीची
सारे मिळूनी उभारू
एक गुढी मांगल्याची !
