फक्त एक वडापाव....
फक्त एक वडापाव....
1 min
249
मित्रांच्या मैफीलीत गप्पा रंगवणारा
गरीब-श्रीमंताला सारखच तोलणारा
अगदी प्रत्येक खिशाला परवडणारा
फक्त एक वडापाव .....
मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा
दिवसभराच्या लोकल नंतर डोळ्यांपुढे दिसणारा
छोट्या मोठ्या भुकेला आवडीने शांत करणारा
फक्त एक वडापाव ....
"आई खाऊ आण हं" हे वाक्य पूर्ण करणारा
वयाच्या प्रत्येक गटाला आपलंस करणारा
प्रत्येकाच्या हदयावर राज्य करणारा
फक्त एक वडापाव .......
