STORYMIRROR

saili nevrekar

Others

3  

saili nevrekar

Others

ठाव‌ कवी मनाचा (अट्टाहास)

ठाव‌ कवी मनाचा (अट्टाहास)

1 min
287

शब्दाला शब्द जुळवण्याचा भलताच खटाटोप 

यमक काहीसं घेऊन वाक्यात विलिन करण्याचा 

अर्थाविना वाक्यसंगती असताना अपुरी ,

का हा अट्टाहास उगीचच शब्दांशी खेळण्याचा ?


गिरबटविले जरीही वाक्य मोडके-तोडके ,

तो अर्थ उमजाया हवाच असतो स्पर्श लेखणीचा 

लेखणीही नमुन‌ जाते अनुभव येता‌ सामोरी , 

मग का हा अट्टाहास त्या लेखणीला हरवण्याचा ?


शुन्यापाशी असताना‌ विश्वात लेखनाच्या 

डंका मात्र वाजतो जगभरी खोट्या अनुभवाचा 

दबतोय हल्ली लेखक सुद्धा जड शब्दांच्या ओझ्याखाली 

का हा अट्टाहास विनाकारण लेखकाला झुकवण्याचा ?

 

मांडले काव्यात दु:ख सारे 

प्रयत्न टिकाकारांना निरुत्तर करण्याचा 

देऊनी मान प्रत्येक लेखनशैलीसाठी ,

सोडता येईल का अट्टाहास लेखका कमी लेखण्याचा ‌ ?


Rate this content
Log in