STORYMIRROR

saili nevrekar

Others

3  

saili nevrekar

Others

स्त्री जन्माचे स्वागत

स्त्री जन्माचे स्वागत

1 min
336

शतका-शतकातील तुलना सारे स्पष्ट करुन जातेय

पूर्वकाळातली स्त्री आज मुक्त होऊ पाहतेय 

मिळायला लागल्यात सवलती पुरुषार्थी तोर्यातल्या 

दूर लोटणारी भिंतही तिला आता सामावून घेतेय !!


भरुन‌ येतं ऐकताना ,समाजाचे विचार उंचावताना 

मुलगीच यावी दारी अशी प्रार्थना करताना 

दिवसामागून दिवस जातील अन्‌ बदलही ‌होतील काही 

पण तिला वंश समजावं अशी प्रथा अजुनही नाही !!


कपड्यांच्या बंधनांप्रमाणे आता विचारही मोकळे व्हावे

अडकलेल्या हतबल स्रीयांनाही स्वातंत्र्य मिळावे 

रस्त्यावरून चालताना त्या‌‌ निर्भयाची आठवण नकोच 

मिळालेल्या स्वातंत्र्यात आणखी एवढे भर पडावे !!


होतेय प्रगती ,घेतायत उड्डाण स्त्रियांचीही पावले 

स्त्री-पुरुष एकत्रच सजवू शिखरांवरचे सोवळे 

एकाच दिवशी नको पाऊस लखलखीत त्या‌ शुभेच्छांचा

बरोबरीने घेऊन चालू या वारसा स्त्री अन् पुरुषत्वाचा !!


Rate this content
Log in