STORYMIRROR

saili nevrekar

Others

4  

saili nevrekar

Others

जर ती नसती तर.....

जर ती नसती तर.....

1 min
197

पुरुष निर्मिती कशी हा प्रश्नच राहिला वेगळा 

स्त्रीशिवाय बदलला असता अर्थच विश्वाचा सगळा 

मुळात तिचे अस्तित्वात नसणे ही व्याख्याच जरा रंजक आहे 

पुरुष प्राधान्य घेऊन‌सुद्धा तो स्त्रीसाठीच तर‌ जगतो आहे 


रेंगाळताना चिमुकले बहीणीचे हात भरवती 

शाळेच्या पहिल्या दिवशी‌ अश्रु आईचे अनावर होती 

कॉलेजातल्या प्रियसिचे बहाणे तर अगदी अल्लडच 

बायकोचे डोळे मात्र नकळत सारे समजुनी घेती 


न‌ सांगताच वेळापत्रक प्रत्येकाचे ती ठेवते 

पोटाच्या खळगीसोबत शरीराची खळगीही भरते 

पराकष्ठा करुनही मात्र स्थान तिचे इवलेसे 

पण पंचपक्वानाला तरी मिठाशिवाय किंमत कुठे असते 


सहनशक्ती स्त्रीजन्माची निर्मात्यालाही ग्यात असावी 

तरीच जग पेलणार्या पृथ्वीला स्रिलिंगी उपमा दिली असावी 

असणे-नसणे तीचे जगात‌ उत्तर शोधु पाहते आहे 

"जर ती नसती तर" हा वादच मुळात अपवाद आहे


Rate this content
Log in