बाबा हो बाबा
बाबा हो बाबा
बाबा हो बाबा तुमचे विचार लय छान
प्राणी पक्षींवर लय तुमची ध्यान ।।
ऊन्हा तन्हात करता काबाळ कष्ट
मयाळू हा जीव तुमचा, किती हा "धनीष्ट"
पेरमाची गोडी आहे हो बेफान
प्रत्येकाच्या हृदयात तुमची गुणगान ।।
क्षण हा मोलाचा राहील पाठोपाठ
याद ही तुमची येईल लगोपाठ
मानवातल्या अंधारला, देता चांदणच उजान
स्वतःच्या जीवाच केल हो रान ।।
जीवा मावळ्यांचे मित्र भेटले हो तुम्ही बाबा
तुमची सर कुणाला येईना हो बाबा
बाबा तुम्हास्नी देवाची ही देणं
करणी तुमच्या हातात भाग्याचे हे घेणं ।।
