STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

4  

Savita Kale

Tragedy

बाबा-एक आठवण

बाबा-एक आठवण

1 min
1.0K

हात माझा सोडुनी

गेला तुम्ही दूर देशा

चिमण्या तुमच्या लाडक्या

बाबा तुम्ही विसरलात कशा ??


अभ्यास चांगला करण्यासाठी

तुमचा धाक असायचा

डोक्यावर आधाराचा

हात तुमचा असायचा


आई मला रागवली

तर जवळ तुम्ही घ्यायचे

मिठीत तुमच्या आले की

सुरक्षित मला वाटायचे !!


स्वतःच्या इच्छांना दिली तिलांजली

सारी स्वप्ने माझ्यातच पाहिली

मला घडविण्यासाठी फक्त

कष्टाची तुम्ही परिसीमा केली


आज आयुष्यात यश मिळाले की

वाटते पहिला तुम्हाला सांगावं

तुमच्या तोंडून माझं कौतुक

भरभरून ऐकावं


पण.... पण नाही ना घडत असं

लेकरू किती तडफडतयं तुमच्यासाठी

तुम्हाला ओरडून सांगून कसं


दाही दिशा शोधून झाल्या

कुठेच तुम्ही दिसेना

क्षणही आता व्याकूळ झाले

तरी बाबा माझे घरी येईना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy