STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

अविस्मरणीय भेट

अविस्मरणीय भेट

1 min
182

तो सुंदर क्षण 

जेव्हा भेटले मी त्यांना

कधी वाटले नाही

पुन्हा भेटेन मी सर्वांना


शाळेतले ते दिवस

पाहून आज आठवे

तीच सगळी ओळख

चित्र नवे दाखवे


खूप वर्षांनी पाहून 

मीच आज गडबडले

करू कुठून सुरुवात

मन जरासे घाबरले


हळू हळू बोलणे झाले

एकमेकांना समजून घेतले

संसाराच्या गोष्टी झाल्या

दंगामस्ती खूप घातले


अशी ही अविस्मरणीय भेट

मनाला सुखावून गेली

सारे सखी सोबतीस भेटून

मनाला गदगद करून गेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational