Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishali salunkhe

Inspirational

4  

vaishali salunkhe

Inspirational

औक्षण

औक्षण

1 min
541


नाते बहीण भावाचे , असे किती किती गोड

असे बहिणीला सदा , भाऊरायचीच ओढ !!


कधी येशील भाऊराया , वाट पाहते बहीण

तुझ्याविना माझा , सुना सुना रे हा सण !!


डोळे लागले वाटेला , माझे आतुरले मन

आठवण तुझी भाऊराया , येते क्षणो क्षण !!


अडकलास कर्तव्यात , नाही येणार तू या घडी

घेऊन आरतीचे ताट , वाट पाहते बहीण ही वेडी !!


देशसेवेसाठी तुझे , तू अर्पिले रे जीवन

तना मनाने करतो , माझ्या मायभूमीचे रक्षण !!


नाही कमजोर धागा , हा तर रेशमी बंध

तुझ्या घामाला ही येई , माझ्या मातीचा सुगंध !!


सीमेवरील माझ्या प्रत्येक भावाचे , देवा कर तू रक्षण

त्याच्या दीर्घायुष्यासाठी , करते येथूनच औक्षण  !!


माया या बहिणीची , सदा आहे तुझ्या पाठीशी

नाते तुझे माझे , जुळले मनाचे मनाशी !!


माझ्या राखीचा भाऊराया , ठेऊनिया मान

कर देशाची तू सेवा , तुझा आम्हा अभिमान !!


कधी मानू नकोस हार , लाव प्राणाची बाजी मायभूमीच्या रक्षणी

नको काही मज दुसरे , दे हीच ओवाळणी  !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational