औकात
औकात
आज तुला तुझी मी
खरीखुरी औकात दाखवतो
पैशाची नशा उतरवून तुझी
आज तूला नक्कीच वाकवतो || 0 ||
खूप अपमान केलास तू
काल माझ्या प्रीतीचा
छळ मांडला होतास तू
कालच्या परिस्थितीचा
गुन्हा तुझा आठवून देऊन
आज तुझे डोळे पाणवतो
पैशाची नशा उतरवून तुझी
आज तूला नक्कीच वाकवतो || 1 ||
खऱ्या प्रेमाला माझ्या तू
असं का पैशात तोललंस
सरतेशेवटी तू तुझं
लोभी असं मन खोललंस
चल आज तुझ्यासमोर
तो क्रूर काळ आठवतो
पैशाची नशा उतरवून तुझी
आज तुला नक्कीच वाकवतो || 2 ||