STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

अटल हिरा

अटल हिरा

1 min
14.5K


अजातशत्रू राजकारणी सच्चा देशभक्त

हिरा असा थोर जन्मास आला भारतात


शब्दपुजारी थोर साहित्यिक प्रतिभावंत

खरोखर हिंदुस्थान देश आहे भाग्यवंत


विरोधासाठी विरोध केला नाही कधीही

विज्ञानाची कास धरायासी होते आग्रही


मृत्यूही जयांच्या सामोरी निःशब्द झाला

'अटळ आहे मृत्यू' जाणले असे सत्याला


असा लाडका लोकनेता कुठे हरपला

अटल तारा अवचित कसा निखळला


शोक सागरात अवघा भारत बुडाला

नतमस्तक होऊन श्रद्धांजली वाहू चला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy