Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Deepa Vankudre

Inspirational

3  

Deepa Vankudre

Inspirational

अत्त दीप भवः

अत्त दीप भवः

1 min
383


लक्ष लक्ष तारे उजळवू या

धरतीवर मंद मंद ज्योती तेववू या

पणतीवर,'अत्त दीप भवः', मनी मंत्र धरू खरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||धृ||


धन मोठे स्वत्वाचे, ते जतन करू या,

अंतरीच्या लक्ष्मीचा सम्मान स्मरू या,

अष्टलक्ष्मीचे सुस्वागत होईल सर्व घरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||१||


रामरूपी ओज जय रावणरूपी तिमिरावर,

धैर्य, शांती, क्षमेने मात होते अधीरावर, 

दिव्यतेचा दीप प्रज्वलित होईल हो सत्वरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||२||


आतिशबाजी होड दिखाव्याची लागते,

धूर पैशाचा होतो, अन प्रदूषण ही वाढते, 

पशु-पक्षी घाबरती, त्या जीवांचा विचार करा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा ||३||


रक्तदान अन् अन्नदानाची शिबिरे उभारू,

गरिबांच्या चूली पेटवू , अश्रू त्यांचे सारू,

उत्सव पर्यावरणाचा, हा अर्थ जाणा जरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||३||


Rate this content
Log in