Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prof. Shalini Sahare

Tragedy Fantasy Thriller

3  

Prof. Shalini Sahare

Tragedy Fantasy Thriller

अस्तित्व

अस्तित्व

1 min
208


भयाण अंधकारातून -अजस्त्र बाहू 

धारण करून शांततेचा भंग करत

अक्राळ विक्राळ अजस्त्र रुप धारण करून 

भयाण हिंस्त्र चित्कार करत 

मानवी देह चिरडत 


बीभत्सचतेचं किळसवाणं अन ओंगळ रुपडं लेऊन 

येवून ठेपलाय तो, ---तो --हो तोच.. अमूर्त असा तो,

जणू असंख्य हाडांचे सापळे रचून 

अनगिनत श्वापदानां पोटात रिचवून 


जणू शांतपणे पहूडलेला अजगर,

ज्याच्या नजरेच्या विखlरानेच  जागच्या जागी थिजणारे मन,

अन निस्त:ब्ध होणारे गात्र, 

त्याच्या प्रचंड बाहुपाशात बेदरकारपणे 

निपचितपणे पडलेल्या जीवांची आहुती, 


चित्कार, हुंकार, किंकाळ्या अन रुदन 

चिखल गाळ, माणसांच्या रक्तमांसाचा, अस्तित्वाचा आणिक  माणूसकीचाही !

हेच का वास्तव शाश्वत जीवनाचे 

की अंतिम सत्य, क्षणभंगुर जीवनाचे !!!

सगळीकडे निरव शांतता, स्मशानशांतता !!  केविलवाणी?????? 


त्यातही --आशेचा एक किरण 

अंकुरणाऱ्या जीवाचा ---

सूर्यबिंबाच्या उगवतीचl पहिला किरण 

अवकाश निरभ्र करणारा 

तन-मनातून झिरपणारा 

माणुसकीचा जिवंत झरा 


अजस्त्र स्पायरोगायराच्या त्या असंख्य शेपट्या तोडून, चिरडून, रणकंदन माजवून त्या रक्ताच्या थारोळ्यातही 

मानवाचा एक -एक श्वास घेण्याचा ध्यास.... 

अन त्याच रक्तरंजित चिखलातून उगवावं कमळ ! निरभ्रतेच.. निर्व्याज्यतेचं.. अन माणुसकीचं....... 

जीवनाच्या अस्तित्वाचं....... 

पडाव्यात पायघड्या फुलांच्या    

टिकवण्यासाठीच अस्तित्व 

तुझं नि माझं....., अन  या सृष्टीचं 

देण्या संदेश विश्वशांतीचा !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy