Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy Action

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Action

असं- कसं जमणं र भाऊ

असं- कसं जमणं र भाऊ

1 min
272


घाम गाळायचा आम्ही

रक्तही आटवायच आम्ही

तुमचे फुकटचे सल्ले अन्

आयत्या पिठावर रांगोळी ?

         असं- कसं जमणं र भाऊ


तुमचा पट्टा, तुमचा बिल्ला

राबणारी आम्ही अन्

मलाई खाणार तुम्ही

तरीही आहेच भिक्षांदेही ?

       असं- कसं जमणं र भाऊ


झेंडे तुमचे , दांडे तुमचे

आमचे मनगट जोर तुमचा

खाणारे तुम्ही गाणारे तुम्ही

होणार तुम्ही नामा निराळे ?

      असं- कसं जमणं र भाऊ


घसा फुटेस्तोवर ओरडावं आम्ही

जिंदाबाद, मुर्दाबाद, नाही तर

येऊन येऊन येणार कोण ?

आयत्या बिळावर नागोबा तुम्ही ?

      असं- कसं जमणं र भाऊ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy