STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

अशी सजली कोजागिरी

अशी सजली कोजागिरी

1 min
260

कोजागर्ती वदे लक्ष्मी 

पुनवेला कोजागिरी

सडा चांदण्यांचा पडे

चंद्र वसुंधरेवरी


शुभ्र धवल चांदणे

नील अंबरी पाझरे

फेर भोवती नक्षत्रे

मनी रोहिणी बावरे


चमचम तारे नभी

दिव्य शुक्लेंदु उजळे

तेज बरसे चंद्रमा

सृष्टी हर्षाने उमले


गंधाळली वसुंधरा

सुगंधाने मनोमनी

प्रेमिकांच्या भावनांना

मुग्धताच भावे मनी


शुभ्र चांदणे विहरे

तेजोत्सव नभांतरी

रंग प्रेमाचा बहरे

उमलत्या पुष्पापरि


चंद्र आणि चांदण्यांची

रासक्रीडा नभी रंगे

चाले अपूर्व सोहळा

उषःकाल लालीसंगे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract