असेच व्हायचे..
असेच व्हायचे..
बाहेर सरीवरं सर बसायची
मन तुझ्या आठवणीतं रमायचे
पाऊस आल्यावर माझे असेच व्हायचे..
बाहेर विजांचा गडगडाट व्हायचा
तुझ्या काळजीत जीव झुरायचा
नको ते नको ते प्रश्न मला छळायचे
पाऊस आल्यावर माझे असेच व्हायचे..
बाहेर पाऊस धुंद होऊन बरसायचा
तुझ्यासोबत भिजण्याचा मोहं नाही आवरायचा
चिंब देह तुझ्या मिठीत विहरायचे
पाऊस आल्यावर माझे असेच व्हायचे..

