अर्घ्य ,,,,, कविता
अर्घ्य ,,,,, कविता
हे दिवाकरा
तुला अर्घ्य द्यावं
इतके पाणी
कुठे शिल्लक आहे रे ....?
तसही
मी अर्घ्य देऊन
तुला अन मलाही
मिळणार तरी काय ....?
हे कुणाला माहिती आहे ....?
म्हणून
आता, मी ठरवलंय
तुला अर्घ्य नाहीच द्यायचं ....!
तुझ्या तप्त झळांनी
कासावीस वाटसरूला
ते अर्घ्य द्यायचं ....
त्याचा आत्मा तृप्त होईल
अन
माझा अंतरात्मा संतुष्ट
पावेल ....!!!!