अरे अरे मेघा
अरे अरे मेघा
अरे अरे मेघा तुला
प्रेम का रे आवडे
प्रियकरा गत माया तुझी आम्हा वरी राहु दे........
झाडे लावू आमच्या साठी
गारवारा सोईसाठी
कॄपा तुझी उन्हाळ्यात
आम्हावरी राहु दे....
वॄक्षतोड थांबवूनी
काळजी घेवू निसर्गाची
दॄष्टी तुझी सॄष्टीतुझी
नजर तुझी आम्हावरी राहू दे.....
प्रेम करू तुझ्यारवी
मायजसी लेकरा परी
वाढवू निसर्गाची शान
झाडे जगवू छान छान
दैनंदिन जीवनात गार वारा वाहू दे........
अरेअरे मेघा तुला प्रेम का रे आवडे....
तुझ्या प्रेमापायी पडीती
चाफ्याची फुलांचे सडे...
सगंधाचे दान कायमचे राहू दे.....

