अपराधी
अपराधी
अपराधी आहे मी तुझा....
तू रडलीस मी अश्रू पुसलेच नाही
तू हसलीस मी आनंद समजावून घेतलाच नाही
तू बोललीस मी ऐकलेच नाही
तू नयनातून लिहले सारे मी वाचलेच नाही
संसाराच्या राहटगाड्यात तू गुंतून राहिलीस
प्रसिद्धीच्या शिखरावर मी चढत राहिलो
मी खरच चुकलो....
असेल तुझा अपराधी फक्त एक सजा कर
मला तुझ्यात सामावून
घे बाकी सर्व वजा कर........

