अपंगत्व
अपंगत्व
देवाचे लाखो आभार,
माझा शरीर धडधाकट
व्यथा अपंगत्वाची ती
फारच असते बिकट,
देव देतो आपणास कर,
त्याचं नाही कधी आदर,
घडतात किती गुन्हे
करावा त्याचा विचार,
कुठे यावे कुठे जावे,
कोणावरच नाही जोर,
पग नाहीत ज्याला तो
किती करतो विचार,
असे पाहिले कित्येक अपंग,
बाहू त्यांचे दोन्ही मंद,
मंद दृष्टी तयांची
पगही होते धुंद,
कितीतरी कला
अंगात तयांच्या,
कोणी कोरे चित्र,
कोणी गाजवी
गाथा कर्तुत्वाचा,
अपंगत्वाचे त्यांना,
कधीच नसे भान,
कला त्यांची,
किती छान,
आश्चर्याचा धक्का म्हणजे,
त्यांच्या अपंगत्वाचा,
असे त्यांना अभिमान
