STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract

3  

Suhas Bokare

Abstract

अन्याय

अन्याय

1 min
252

आरशा सामोर अंतर्भाव सारे.

हासतांना फाटले ते घाव सारे.


जिंकलेल्या भावना शोधीत गेल्या.

हारलेले खोडलेले नाव सारे.


टांगल्या स्पर्धेत त्या नाना पताका.

फाडलेले संपलेले ताव सारे.


खिन्न डोळ्यांच्या विझाव्या अग्निधारा.

आसवांचे संपले टकराव सारे.


"टाळक्याला ताण नाही द्यायचा तू .

पद्धतींचे मान्य कर अटकाव सारे".


टोळक्यांनो धाड मारा, दावतो मी.

मोजलेले नोट, त्यांचे भाव सारे.


विष तु पाण्यालाच पाजुन सांगतो रे... 

घाण झाले फार आज तलाव सारे...


पत्थरांनी मारु नाही सांगते तू.

मारू दे, का संपवीते वाव सारे.


दूनियेची आपल्या मार्गेच न्यारी.

पाहतो मी , होव दे पथराव सारे.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract