अंतर तुझे माझे
अंतर तुझे माझे
अंतर तुझे माझे
कणभरही नकोय ...
मुंगी जायला देखील
जागा नकोय आता....
तुझी नित्तळ काया
डौलदार सुरेख बांधा..
जीव होई वेडापिसा
मन माझे पाणी पाणी...
स्पर्श तुझ्या ओठांवर
भासे मखमल मला...
गुंतणे केसात तुझ्या
स्वर्गसुख वाटे मला....
तु मी गुंतलो जणू
सबंध स्पर्श एकजीव...
धुंद बेभान अतृप्त
क्षण प्रणय आपुला...

