STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

अंत

अंत

1 min
58

रात्रीचे साडेबारा वाजलेले आणि अचानक फोनची घंटी वाजली आणि काळजात चर्रर झालं घाबरत घाबरतच अभीने फोन उचलला तिकडून दबक्या आवाजात डाॅक्टर बोलत होते. अभी ,साॅरी टू से तुझ्या बाबांची प्राणज्योत आताच मालवली आहे आणि पुढच्या अर्धा तासात आम्ही स्मशानभूमीत त्यांचे दहन देणार आहोत. तुला त्यांना लांबून पहायला येईल. तू ये स्मशानभूमीत. 

   झालं जे नको वाटत होते तेच झाले. कोरोना ने घरातला चमकता तारा निखळवला.पुढचे पाच मिनिटं स्मशान शांतता आणि अभी ढसाढसा रडायला लागला पण रडत बसायला वेळ नव्हता नाही तर बाबांना शेवटचं बघता ही आल नसत. पटकन अभी उठला आणि एक दोन 

फोन फिरवले आणि पिंट्याला घेऊन त्यानं स्मशानभूमी गाठली. अॅम्बुलन्स आधीच हजर झाली होती सोबत औषध फवारणारी गाडी आणि  

पांढरे पोषाख ,पॅक मास्क घातलेले सेवक ही हजर होते. ते जणू स्वर्गातील सेवकच भासत होते. अभीला पहाताच त्यांनी झटपट तयारी सुरू केली. लाकडे रचून झालेेली होती आता फक्त अग्नी द्यायच बाकी होते. 

 अॅॅॅम्बुलन्सचा दरवाजा उघडला गेला आणि अभीचा बांध फूूूटला स्मशानशांततेत बाबा म्हणून फोडलेला हंबरडा काळजाला चिरत गेेला. तिथ असणार्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळून गेले. 

        झटपट अग्नी दिला गेला सारं काही इतक्या लवकर झाले की काही कळले नाही. 

लांबून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. सारं काही संपले होते. महामारीने घात केला हो.असा अंंत

बाबा घेऊन येतील असे अभीला स्वप्नात ही वाटले नाही. बाबांच अचानक निघून जाण खूपच चटका लावून गेल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy