अनोळखी ....
अनोळखी ....
एकदा असाच प्रवास करत होते बसमधून....
बस भरलेली लोकांनी खचखचून...
बसमध्ये किलबिलाट चालू होता...
अनोळखी नजरा फिरत होत्या...
मला ही कोणी ओळखीचं नव्हतं...
म्हणून माझी नजर नजर खिडकी बाहेर होती डोकावत ....
एका बस स्थानकावर बस रिकामी झाली...
मागे वळून पाहिले तर एक आजी पाठीमागच्या सीटवर बसलेली...
पाठीमागच्या सीटवर बसणे म्हणजे कंबरेचा खुळखुळा होणे...
मनात आला विचार आजीला तिथून उठवून माझ्या शेजारी बसवावे ...
मी लगेच गेले तिच्या दिशेने आणी माझे काम फत्ते केले....
अनोळखी आजी गुपचूप बसलेली...
मधेमध्ये सिम्त हास्य करत होती...
मग मी च तिला बोलतं केलं...
आणी अनोळखी आजी भरभर बोलू लागली ....
एकाच स्टॉप वर उतरणार होतो आम्ही ..
म्हणून गप्पा वाढत गेल्या....
बस थांबली आणि कधी आमचा स्टॉप आला नाही कळलं आम्हाला ....
आम्ही दोघी उतरलो .....
निरोप घेताना आजीने माझ्या डोक्यावर हात ठेवला ....
आणि ती अनोळखी आजीला माझ्या मनाने आपलंस केलं ....
