STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

अनंत आमची ध्येयासक्ती

अनंत आमची ध्येयासक्ती

1 min
288

अनंत आमची ध्येयासक्ती,

अनंत आहेत आशा,

यशाचे शिखर करू या सर,

उजळतील दाही दिशा.


करू परिश्रमाची पराकाष्ठा,

नको कुचराई कसली,

जो ध्येयाने झपाटलेला,

त्यासी यशाची वाट गवसली.


ध्येय बाळगून पुढे जाण्याचे,

सोबतीने सारे चालूया,

समबंधुता ठेवून आपण,

यशाचा झेंडा मिरवू या.


अनंत आमची ध्येयासक्ती,

अनंत आहेत आशा,

सारे मिळून यशस्वीपणे,

बनवू समृद्ध भारत देशा.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational