STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

अण्णाभाऊ हृदयात आहे

अण्णाभाऊ हृदयात आहे

1 min
247

अण्णा भाऊचं गुणगान, कोटी मुखात आहे

अन् अण्णा भाऊ आमच्या हृदयात आहे...


अण्णा भाऊची शब्दात वर्णावी काय महती

नाही झाला नाही होणार असा साहित्यरत्न जगती

किर्ती या शाहीराची साऱ्या जगात आहे...।।


अशा महापुरुषांना नसते ते मरण

अण्णा भाऊचे आम्हा होई रोज स्मरण,

किती ज्ञानप्रकाश त्यांच्या साहित्यात आहे....।।


वाटे सारा समाज माझा आता एक व्हावा

अण्णा भाऊंना साहित्य रत्न मिळायलाच हवा,

उठाव यासाठी आता साऱ्या देशात आहे...।।


लेखणीरुपी तलवारीने केले अण्णाने वार

किती महान साहित्यिक तो लोकशाहीर,

पुतळा उभा अण्णा भाऊचा त्या रशियात आहे...।।


करू जयजयकार बोला जय अण्णा भाऊ

सारे एकमुखाने कीर्ती अण्णाची गाऊ,

साऱ्या विश्वाचं तत्वज्ञान त्यांच्या साहित्यात...।।

अन् अण्णाभाऊ आमच्या हृदयात आहे...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational