STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

अंधारलेल्या आयुष्यात या

अंधारलेल्या आयुष्यात या

1 min
209

अंधारलेल्या आयुष्यात या, यावेस तू काजव्या परी,

उजळूनी मनदिशा या, रंग मैफिलीत भरुनी,

आशय होऊन या आशेचा, दूर निराशा करी,

काळोखाच्या या रात्री, तू पौर्णिमेचा चंद्र होऊनी १.


गोंधळलेल्या वाटेवरती, एक वेगळी वाट होऊनी,

मार्ग हरवता सूर सापडे, त्या तुझ्या सोनपावली,

मार्ग जीवनी अवखळ वाहतो, असता तू सांगाती,

चांदणे मनी लुकलुकते, आकाशीच्या निळ्या आभाळी.२


पर्व चालले ते दुःखाचे, प्रहर सुखाचा तूच असावा,

वादळातल्या नौकेचा , शांत किनारा तूच असावा,

धावपळीच्या क्षणांमधला, सुटकेचा निश्‍वास असावा,

मिणमिणत्या पणतीमधला, अंधाराचा तू ठाव असावा. ३.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract