STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Inspirational

3  

Pandit Nimbalkar

Inspirational

अंधारातून वाट शोधुन जावू पुढे

अंधारातून वाट शोधुन जावू पुढे

1 min
254

संकल्प करू, संघर्ष करू, देवू लढे

अंधारातून वाट शोधून, जावू पुढे ||धृ||


नव्याने बसवू, जीवनाची आता घडी

एकत्र राहू, ना करू निसर्गाची खोडी 

हव्यास सोडू, माणुसकीचे शिकू धडे

अंधारातून वाट शोधुन, जावू पुढे ||१||


विज्ञानाचे उपाय शोधू, होवू ज्ञानी 

संस्कृतीशी नाते जोडू, राहू समाधानी 

कर्तव्य जाणू, स्वाभिमानाने राहू खडे 

अंधारातून वाट शोधुन, जावू पुढे ||२||


सृष्टी सारी सजवू, पर्यावरण जपू 

प्रदुषण सोडू,नाही कधी वृक्ष कापू 

पशूपक्षांचे अस्तित्व टिकवू, लावू झाडे 

अंधारातून वाट शोधून, जावू पुढे ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational