STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

अंधार

अंधार

1 min
224

अंधार दाटला चोहीकडे 

सारे जग झाले शांत,निरामय 

वाटा आशेच्या संपल्या इथे 

शांत निपचित देह करुणामय 


वाट कशी काढावी यातून 

विचार मनात सारखा घोळतो 

उद्याच्या आशेवर जगण्याचे 

भविष्य तो आजमावूनी पाहतो 


अंधार निराशेचा चिंतीत करतो 

प्रश्न जगण्याचा मनाला भेडसावतो 

होईल सुंदर स्वप्नांची सोनेरी पहाट 

स्वप्न उद्याची आनंदाची रंगवितो 


अंधाराने झाल्या सून्न,सून्न वाटा 

साद निसर्ग घालतो त्यांना 

तेव्हढाच मैत्रीचा जिव्हाळा 

दुर्लभ आनंद देई दु:खी मना 


तुझे आणि माझे जगणे एक आहे 

दु:ख आणि सुख चक्र नित्य आहे 

एक मिळतो मनाला भव्य दिलासा 

हृदयाच्या भावना मोकळ्या केल्या आहे 


जगणे उद्याच्या कणखर आशेवर 

मरण भीती नसे कधी मनास 

जेव्हा येईल आपला एक दिवस 

तेव्हा न चुकले आपल्यातील कुणास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational