STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

अंधार

अंधार

1 min
244

कोण म्हणतं अंधार नेहमी वाईट असतो?

अंधाराने कुशीत घेतलेले असतात अगणित हुंदके,

दिलेला असतो आश्रय लपवलेल्या दुःखाला,

घातलेले असते पांघरूण एखाद्याच्या कुरूप चेह-यावर,

केलेली असते मदत संतप्त भावनांचा निचरा करायला!

पेरलेलं असतं बीज उद्याच्या आशेचं,

केलेला असतो समारोप पराभूत मनाचा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational