STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

अन् कोरोना गावात शिरला

अन् कोरोना गावात शिरला

1 min
173

सोडून मुंबई पुणे आता ज्यानं गावाचा रस्ता धरला 

माणसाने माणूस हेरला अन् कोरोना गावात शिरला 


आता नियम तुम्ही पाळा, जरा बाहेर जाणे टाळा

तुम्ही घराचे घरधनी हो जपा सांभाळा मुलंनी बाळा

घरी राहुनी करू सुरक्षा, आता पर्याय एकच उरला

माणसाने माणूस हेरला, अन कोरोना गावात शिरला 


अस पहिल्यांदाचं झालं, लॉक डॉऊन देशात झालं

करून जगाचा अभ्यास, हे पाऊल भल उचललं

मात करू महामारीवर, कसा भलता रोग अवतरला

माणसाने माणूस हेरला, अन् कोरोना गावात शिरला 


पोलीस डॉक्टर देतात सेवा, तुम्ही जाणीव यांची ठेवा

सहकार्य करून देशाला, जागरूक करू गावाला

हिंमत देऊन लढू चला, स्वार्थाने माणूस विखुरला

माणसाने माणूस हेरला, अन् कोरोना गावात शिरला 


सोडा आज मनातील सार, ठप्प झाला सारा कारभार

घाव घातला कसा अचानक, बिना तीर आणि तलवार

शिकवलं महामारीने शेवटी, गर्वात माणूस जिरला

माणसाने माणूस हेरला, अन् कोरोना गावात शिरला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational