STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

2  

Dilip Yashwant Jane

Inspirational

अमृत धारा

अमृत धारा

1 min
231

किती उरलेत आता

पावसाळे जीवनाचे

नको उरी भय चिंता

आनंदात जगायचे


ढग काळे काळजीचे

किती जपावे मनात

धारा अमृताच्या साऱ्या

बरसाव्या जीवनात


मृग नक्षत्रा सारखे

मन सारेच नटावे

सूर नविन गाण्याचे

कंठी जमून रे यावे


शब्द सुरांची मैफल

यावी पुन्हा जीवनात

धुंद होऊन जगावे

गावे गीत आनंदात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational