अलौकिक गोवा
अलौकिक गोवा
आज दिवस मोलाचा
दर्जा स्वतंत्र राज्याचा,
अलौकिक संस्कृतीचा
लाभलेल्या वारसेचा..!!१!!
हिंदू ख्रिश्चन पगडा
सांस्कृतिक एकात्मता,
सामाजिक ऐक्य मुल्ये
दिसे गोव्यात एकता..!!२!!
व्यवसाय पर्यटकी
आकर्षण परदेशी,
यात्रास्थळ ख्रिश्चनाचे
सह्याद्रीच्या कुशी वसी..!!३!!
भाषा कोकणी मराठी
काम शेती मासेमारी,
सण साजरे उत्साही
गोवा अलौकिक भारी..!!४!!
रम्य देखावे नयनी
निसर्गाचे सागराशी,
आनंदित मनमौजी
भेटताच गोवावासी..!!५!!
