अक्षरांना पुटला पान्हा
अक्षरांना पुटला पान्हा
अक्षरांना फुटतो पान्हा
शब्द गोळा होतात
त्या शब्दांच्या एकोप्याने
वाक्याला अर्थ येतात
राग, लोभ, द्वेष, आनंद
वाक्यातून समजतात
याच वाक्याच्या अर्थातून
प्रेम अन युध्द उदभवतात
तोडता येतात, मोडता येतात
वाक्य पुन्हा जोडता येतात
वाक्यांनी तुटलेली नाती
जोडता जोडता नकोशी होतात
म्हणून म्हणतो मित्रांनो
शब्दांनी वाक्य करा सुंदर
तोंडातून उच्चारण्या पूर्वी
करा विचार अगोदर
