STORYMIRROR

Laxman shinde

Children Stories

3  

Laxman shinde

Children Stories

सहल करू या जंगलाची

सहल करू या जंगलाची

1 min
162

निसर्ग गीत 

सहल करु या जंगलाची 

डोंगर दरा-या, कड्या कपारी, घरटी पाहू पक्ष्यांची

चला जाऊ या फिरु डोंगरी, सहल करूया जंगलाची

फुलपाखरे गोळा होतील, फिरतील सारी भवताली

फिरू या जंगल गाऊ गाणी, पाहू झाडे मोठाली

सळसळ करती वा-यावरती, हिरवी पाने वृक्षांची

चला जाऊ या फिरु डोंगरी, सहल करूया जंगलाची

बसून वेलीच्या झोक्यावरती, गाणे गाऊ जंगलाची 

किती मजा त्या जंगलामध्ये, जत्रा पाहु प्राण्याची

खळखळ करती झरे इथले, चाखू चव त्या पाण्याची

चला जाऊ या फिरु डोंगरी, सहल करूया जंगलाची

कोकीळ गाते आनंदाने, राघू बोले मैनेशी

राहू आपण आनंदाने, नाते जपू या जंगलाशी

माणसालाही सांगू आपण, नको दुश्मनी कोणाची

चला जाऊ या फिरु डोंगरी, सहल करूया जंगलाची

Rate this content
Log in