STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
207

छत्रपतींच्या कर्तृत्वाने व धाडसाने

महात्मा फुले सावित्री यांच्या शिक्षणाने

छत्रपती शाहू महाराजांच्या एकोप्याने 

बाबासाहेबाच्या संयम व लेखनिने

उभा आहे महाराष्ट्र माझा आज दिमाखाने


साधू, संत, सुधारक याच्या विचाराने

कलाकार, कलावंत यांच्या कलेने

साहित्यिक, कवी यांच्या लेखणीने

 शेतकरी, कामगार यांच्या कष्टाने

उभा आहे महाराष्ट्र माझा आज दिमाखाने


गीतेतील वचनाने 

संविधानातील कायद्याने

सैनिक, शहीदांच्या त्यागाने

ग्रंथ, पुस्तकातील विचाराने

उभा आहे महाराष्ट्र माझा आज दिमाखाने


जात, पंथ अनेक भाषांनी व्यापलेला

अत्याचार अन् अन्यायाने ग्रासलेला

महामारी व अनेक आजाराने त्रासलेला

राजकीय व्यवस्थेने बुरसटलेला

तरी ही उभा आहे महाराष्ट्र माझा आज दिमाखाने


Rate this content
Log in