STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

काय गुन्हा होता

काय गुन्हा होता

1 min
122

काय गुन्हा होता

प्रीत तुझ्यावर जडली

होकार तुझाच होता

गाडी कशात अडली


काय गुन्हा होता

नजर नजरेला भिडली

इशारा तुझाच होता

वाट दाऊन गेली


काय गुन्हा होता

मना भुरळ पडली

सौंदर्य तुझेच होते

अश्रू ढाळून गेली


काय गुन्हा होता

शब्द शब्दात जमले

लिखाण तुझेच होते

पुसट होऊन गेले


काय गुन्हा होता

वाट सुंदर दिसली

दिशा तुझीच होती

आघात करून गेली


काय गुन्हा होता

स्वप्नात तूच आली

प्रकाश लख्ख असताना

अंधार करून गेली


Rate this content
Log in