STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

हिवाळ्यातील गारवा

हिवाळ्यातील गारवा

1 min
164

पूर्वी सारखा ॠतु 

आता उरला नाही

हिवाळ्याची मजा

काही दिसत नाही


नाकाला असायची

शेंबडाची धार

मनगटावर असायचा

मेकडाचा भार


शेकोटीला जळायची

प्रत्येकाची सासू

धुराने मात्र यायचे

डोळ्यात आसू


भुईला हातरायला

पोत्याच तरट असायच

अंगावर घ्यायला

गोधड उबदार मिळायच


ओठ अन टाचा

टरारुन उलायचे

आमसूल अन मेण

भेगात भरायचे


तेंव्हाची मजा आता

उरलीच नाही

हिवाळ्यात थ॔डी आता

पडतच नाही


Rate this content
Log in