STORYMIRROR

Laxman shinde

Thriller

3  

Laxman shinde

Thriller

लहानपणीचा पाऊस

लहानपणीचा पाऊस

1 min
139

पाऊस आला पाऊस आला 

आसमंत सारा भिजून गेला


पावसाचा तो थेंब ओला 

मातीमध्ये विरून गेला


मातीचा तो सुगंध सारा

घेऊन आला टपो-या गारा


बालगोपाळांची मजा झाली

मातीतच मग खेळू लागली


मातीचे घर अन् मातीचेच लाडू

मातीचा संसार मातीतच मांडू


स्वप्न मनाशी घेऊन भारी

खेळामध्ये दंग सारी


एवढ्यात मोठी सर आली

संसार सगळा घेऊन गेली


स्वप्न मनातील मनातच सरली

खेळ मोडूनी घरी पळाली


असा हा पाऊस लहानपणीचा

खोडसळ बारीक खोडीचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller