आपली माय मराठीत
आपली माय मराठीत
1 min
123
करीन म्हणतो मराठीचा
समाजात प्रसार अन् प्रचार
समजून द्या माय मराठीत
आपले आचार अन् विचार
इतर भाषांच ही असाव
आई माऊशीच नातं
पण आपल्या आईच
का ठेवाव मन रितं
दुःख होत बाजारात गेल्यावर
बोलतो आपण परक्या भाषेत त्याला
नाही समजली माय मराठी तर
खरेदी त्याच्याकडून करता कशाला
पोटासाठी शिकेल तो ही
आपली माय मराठी
साधी सोपी तर आहे
कुठे आहेत अडवळनाच्या गाठी
प्रथम आपणच मान राखा
आपल्या माय मराठीचा
समृद्ध होईल आपली भाषा
क्षण येईल सौभाग्याचा
