STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

थंडी हिवाळ्याची

थंडी हिवाळ्याची

1 min
155

पूर्वी सारखा ॠतु 

आता उरलाचं नाही

हिवाळ्याची थंडी आता

अंगाला झोंबतच नाही


नाकाला असायची

शेंबडाची धार

मनगटावर असायचा

मेकडाचा भार


शेकोटीला जळायची

प्रत्येकाची सासू

शेकोटीतील धुराने 

यायचे डोळ्यात आसू


भुईला हातरायला

तरट मिळे पोत्याचं

अंगावर घ्यायला

उबदार गोधड असायचं


ओठ अन् टाचा

टरारुन उलायचे

आमसूल अन् मेण

भेगात भरायचे


कडाक्याची थंडी

उरलीच नाही राव

आली आली म्हणता

खाऊन गेली भाव



साहित्याला गुण द्या
लॉग इन