STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

आठवते दिवाळी

आठवते दिवाळी

1 min
154

आठवते अजून ही

लहानपणची दिवाळी

नवीन कपडे नसले तरी 

नटून बसायचो सकाळी


कुडकुडणा-या थंडीत 

आई आंघोळ घालायची

नाही उठलो लवकर तर

नरकात जाशील म्हणायची


दिवाळी जवळ आली की

कर्त्याला धसका बसायचा

दिवाळी गोड व्हावी म्हणून 

कर्ज बाजारी व्हायचा


फटाक्यांची आतषबाजी

अंगणात असायची

लवंगी अन टिकल्या मध्ये 

दिवाळी साजरी व्हायची


अंगणातील दिव्यांनी 

घरं सजून जायची

दारातील आकाश कंदीलानी 

मान उंचावत राहायची


दिवाळीचा फराळ म्हणजे 

चिवडा ताटात असायचा 

आलाच घरी कुणाचा तर 

लाडू ताटात दिसायचा


दुःख नव्हतं वाटत तेव्हा 

सल मनी असायची 

अशी आमची दिवाळी 

साजरी आनंदात व्हायची


कष्ट केले कुटुंबाने 

आहेत दिवस सुखाचे

पूर्वीसारखे नाही राहिले 

दिवस कोणत्याच सणाचे


Rate this content
Log in