STORYMIRROR

Laxman shinde

Inspirational

3  

Laxman shinde

Inspirational

वन गीत

वन गीत

1 min
199

चला जाऊ निसर्गात, गाणं गाऊ तिथं

माणसात निसर्गाचं, घट्ट करू नातं


रोप लावू डोंगराला, हिरवं करु रान

दाटी करू डोंगराला, कमी करू उन

बोलवून पावसाला, दुष्काळाला मात

माणसात निसर्गाचं, घट्ट करू नातं


आळंदीत माऊलीच्या, पिंपळाची छाया

देहू गावी तुक्याच्या त्या, झाडावर माया

झाडालाही देव मानू, जोडू झाडा हात

माणसात निसर्गाचं, घट्ट करू नातं


देऊ एक ललकारी, झाडे लावा दारी

जिथ जिथ मोकळीक, लावू झाड सारी

जाग करू माणसाला, पेटवून वात

माणसात निसर्गाचं, घट्ट करू नातं


पंढरीच्या विठोबाची, करू नित्य वारी

वारीच्या त्या वाटेवर, झाडे लावू सारी

झाडाच्या त्या सावलीत, रमू अभंगात

माणसात निसर्गाचं, घट्ट करू नातं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational