STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

पोरी

पोरी

1 min
213

उंच उड आकाशी तू 

पण जप तुला पोरी

आकाशातही उडतात 

गिधाडं अन् घारी


चोच मारतील, झडप घालतील 

बोचकारतीलही तुला

रोज शोधतात नवीन सावज

लाज नसते गिधाडाला


घिरट्या घालतील तुझ्या भोवती 

हाकही देतील मायेची 

तु भुलू नको त्यांच्या मायेला 

हिम्मत ठेव लढण्याची


जमिनीवरही कमी नाहीत

 लांडगे दबा धरून बसलेले

सावध हो पोरी तू आता

कमवं शरीर पिळदार कसलेले


भिऊ नकोस पोरी तू 

लेक आहेस कोणाची 

त्या शूरवीर रणरागिणी 

जिजाऊ, सावित्री, रमाची


चीड नाही समाजाला

उघड्या डोळ्यांनी बघतो

 घडलंच काही विपरीत 

पोरी तुलाच नावं ठेवतो


एक सांगणं आहे पोरी तुला

तुही सावध होऊन वाग

आई-बाबांच्या इज्जतीला 

लावू नकोस डाग



Rate this content
Log in