अजून यौवनात मी
अजून यौवनात मी
केस असू देत पिकलेले माझे
कलप करून दिसतात छान |
मात्र अजूनही यौवनातच मी
नका बघू असे वळवून मान | |१
बोळकं झाले तोंडाचे जरी
करते मी आईस्क्रीम फस्त |
मात्र अजूनही यौवनात मी
नका बघून मला होऊ त्रस्त | |२| |
नाही ऐकायला येत थोडं
वया परत्वे थकलेत कान |
मात्र अजूनही यौवनात मी
गाणी गात बसते छान | |३| |
डोळ्यांवर ही बसलं ढापण
कमी कमी दिसू लागलं जरा |
मात्र अजूनही यौवनात मी
मी बरी अन् माझा पेपर बरा | |४ |
चाललं तर आता थकतात पाय
वयापरत्वे शरीर जातं थकून |
मात्र अजून यौवनात मी
व्हरांड्यात घेते योगा करून | |५| |

